19168
नंदूरबार : गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी होते. शेजारी अनिता चौधरी, गौरव चौधरी, विस्तार शीलवंत वाकोडे, महेंद्र फटकाळ, अनिल चौधरी आदी.
--------------------------
अभ्यासाबरोबर क्रीडा, इतर उपक्रमात प्रगती करावी
प्रथमेश चौधरी : नंदूरबारला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानावर भर न देता क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. शिक्षण व संस्कारांच्या बळावर जीवनात मोठे व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी केले.
येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकारमहर्षी श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी होते. उपाध्यक्ष अनिता चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, विस्तार अधिकारी शीलवंत वाकोडे, संस्थेचे सहसचिव महेंद्र फटकाळ, मुख्याध्यापक अनिल चौधरी, युवराज भामरे, किरण त्रिवेदी, सुरेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यध्यापक अनिल चौधरी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सम्यक शीलवंत वाकोडे प्रथम, ज्ञानवर्धन लक्ष्मीकांत चौधरी द्वितीय, सिद्धांत रमेश बच्छाव तृतीय, आरुषी जितेश राठोड चौथा तर निकिता संजय पाटील हिने पाचवा क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना उपाध्यक्षा श्रीमती. चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता चांगले संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर जीवनात प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चेतना चौधरी यांनी सूत्रसंचालन, उज्ज्वला चौरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, अमोल भदाणे, विशाल चौधरी, कर्मचारी जितेंद्र चौधरी, शेखर पाटील, रवींद्र चौधरी, सुधाकर ठाकूर यांनी परिश्रम घेतले.