NSK26H19183
जळगाव : केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे विद्यालयात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्याांच्या गौरव सोहळ्यात सत्कारार्थी विद्यार्थ्यांसह सोसायटीचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद.
----
दहावीतील गुणवंतांवर
शाळेची कौतुकाची थाप
उपशीर्षक
ए. टी. झांबरे विद्यालयात गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : केसीई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या वेळी संचालक डॉ. ए. आर. राणे, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य केतन चौधरी, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, ज्येष्ठ शिक्षक महेंद्र नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रम, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृष्णा सागर झांबरे, भूमिका गोपाळ चौधरी, कार्तिक दत्तात्रय पवार, सोनाक्षी प्रवीण पाटील, करण भूषण पाटील, अलख निरंजन वाणी, साईराज समाधान पाटील, वृषाली किरण असोदेकर, गिरीश मनोज सोनवणे, सत्यम देवराम महाजन, भूमिका सतीश पाटील, योगिनी विनोद महाजन, प्रतिज्ञा हरीश प्रजापती, निवृत्ती ज्ञानेश्वर राठोड, दृष्टी संदीप ढगे, प्रेरणा प्रवीण गोसावी, नीलेश पृथ्वीराज देशमुख, उर्वशी योगेश शेटे व निखिल दामोदर धारकर यांचा समावेश होता.
----------