NSK26H19189
जळगाव : ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभागातर्फे आयोजित शिबिरात रक्तदान करताना तेजलदीदी व सहकारी.
रक्तदान ही मानवतेची खरी पूजा
उपशीर्षक
डॉ. किरण पाटील : ब्रह्माकुमारीज् वैद्यकीय प्रभागातर्फे रक्तदान शिबिर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तर आहेच; पण आपली ही सामाजिक जबाबदारी असून, हीच खरी मानवतेची पूजा असल्याचे मत ब्रह्माकुमारीज् वैद्यकीय प्रभागाचे जळगाव उपक्षेत्रीय समन्वयक डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.
ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी सेवा केंद्रात वैद्यकीय प्रभागातर्फे आयोजित आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र संयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक धीरज सोनी, ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, गायत्री कुळकर्णी उपस्थित होते. ब्रह्माकुमारीज स्थापनेच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त जळगाव सबझोनमध्ये नव्वद कार्यक्रम मालिकेंतर्गत आयोजित केला गेला. शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
शिबिरास गोळवलकर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गायत्री कुळकर्णी, डॉ. मकरंद वैद्य, जागृती लोहार, जयवंत पाटील यांचे तर ब्रह्माकुमारीजचे राजश्री वाघोदे, राजूभाई यांचे सहकार्य लाभले.