सोने एक हजाराने महागले
---
चांदीचे भाव स्थिर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढल्यानंतर सोने- चांदीच्या भावाने उसळी घेतली होती. गुरुवारी (ता. १४) सोन्याचे भाव एक हजार रुपयांनी वाढले. तर चांदीच्या भावात वाढ झाली नाही.
मागील तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ होत होती. गुरुवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या भावात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने-चांदीचा भाव ठरतो. जागतिक बाजारात रुपया कमजोर झाला आहे.
हजाराने सोने वधारले
जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी (ता. १३) सोन्याच्या भावात साडेसात हजारांची वाढ होऊन एक लाख ५९ हजार (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) पोहोचले होते. यात गुरुवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ६० हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी), तर जीएसटीसह एक लाख ६४ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. बुधवारी चांदीच्या भावात १६ हजारांची वाढ होऊन प्रतिकिलो (विनाजीएसटी) दोन लाख ८५ हजारांवर पोहोचली. गुरुवारी चांदीचे भाव स्थिर आहेत.
---
गेल्या काही दिवसांतील भाव (विनाजीएसटी)
तारीख --- सोने (प्रतिदहा ग्रॅम) --- चांदी (प्रतिकिलो)
६ मे --- एक लाख ५० हजार --- दोन लाख ४९ हजार
७ मे --- एक लाख ५१ हजार ५०० --- दोन लाख ५७ हजार
९ मे --- एक लाख ५० हजार ८०० --- दोन लाख ६० हजार
११ मे --- एक लाख ५० हजार --- दोन लाख ५९ हजार
१२ मे --- एक लाख ५१ हजार ५०० --- दोन लाख ६९ हजार
१३ मे --- एक लाख ५९ हजार --- दोन लाख ८५ हजार
१४ मे --- एक लाख ६० हजार --- दोन लाख ८५ हजार