पाच धरणांतील २९ लाख लिटर पाण्याचा व्यावसायिक वापर
जलसंपदा विभागाची इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांतील रेसॉर्टला परवानगी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : धरणांचा तालुका, अशी ओळख असलेल्या इगतपुरी येथील भावली धरणासह त्र्यंबकेश्वरच्या गौतमी गोदावरी व गंगापूर अशा पाच धरणांतून आठ व्यावसायिकांना २९ लाख लिटर पाणी व्यावसायिक वापरासाठी देण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.
जलसंपदा विभागातर्फे व्यावसायिक पाणी वापरासाठी अधिकृत परवानगी दिली जाते. या विभागाने १२ मे २०२६ मध्ये आठ शासन निर्णय प्रसिद्ध करत व्यावसायिकांना पाणी वापरासाठी परवानगी दिली आहे. यात भावली धरणातून सर्वाधिक चार व्यावसायिकांना पाणी मिळणार आहे. महेश्वर इस्टेट्स एलएलपी जामुंडा यांना सहा कोटी दहा लाख ४२ हजार लिटर, जामुंडा हिल्स् इस्टेट्स, जामुंडा यांना चार कोटी २७ लाख ७४ हजार लिटर, द ग्रॅन्ड गार्डन रिसॉर्ट ॲन्ड स्पा-पिंप्रिसदोद्दिन यांना ३१ लाख ९२ हजार लिटर व फॉरेस्ट फार्म नर्सरी, तारांगणपाडा यांना २९ लाख ३६ हजार लिटरची परवानगी देण्यात आली. तसेच चेहेडी खु. (ता. निफाड) येथील गो ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना चार कोटी ४९ लाख ९३ हजार लिटर पाणी देण्यात येईल. वाकी प्रकल्प समूहातून निशांत इन्फ्राडवेल प्रा. लि. भावली बु. (ता. इगतपुरी) यांना ३८ लाख २७ हजार लिटर, गौतमी गोदावरी अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) रिसोर्ट व हॉलिडे होमला दोन कोटी २३ लाख ८६ हजार लिटर पाणी मिळेल आणि गंगापूर धरणातून पिंपळगाव गरुडेश्वर येथील श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड हाऊसिंग इंडिया प्रा. लि. यांना दहा कोटी १९ लाख चार हजार लिटर पाणी देण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही धरणांनी यंदा तळ गाठला आहे.
---
भावली धरण (ता. इगतपुरी)
- महेश्वर इस्टेट्स एलएलपी जामुंडा - सहा कोटी दहा लाख ४२ हजार लिटर
- जामुंडा हिल्स् इस्टेट्स, जामुंडा - चार कोटी २७ लाख ७४ हजार लिटर
- द ग्रॅन्ड गार्डन रिसॉर्ट ॲन्ड स्पा-पिंप्रिसदोद्दिन - ३१ लाख ९२ हजार लिटर
- फॉरेस्ट फार्म नर्सरी, तारांगणपाडा - २९ लाख ३६ हजार लिटर
…
वालदेवी बु.ल.पा. प्रकल्पातून
गो ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चेहेडी खु. (ता. निफाड) - चार कोटी ४९ लाख ९३ हजार लिटर
…
वाकी प्रकल्प समूहातून
निशांत इन्फ्राडवेल प्रा. लि. भावली बु. (ता. इगतपुरी) - ३८ लाख २७ हजार लिटर
…
गौतमी गोदावरी अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर)
- रिसोर्ट व हॉलिडे होम - दोन कोटी २३ लाख ८६ हजार लिटर
…
गंगापूर धरण
श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड हाऊसिंग इंडिया प्रा. लि.
- पिंपळगाव गरुडेश्वर (जि. नाशिक) - दहा कोटी १९ लाख चार हजार लिटर