सिनेस्टाईल कोयत्याचा धाक दाखवून अतिप्रसंगाचा प्रयत्न

सिनेस्टाईल कोयत्याचा धाक दाखवून अतिप्रसंगाचा प्रयत्न
Published on
सिनेस्टाईल कोयत्याचा धाक दाखवून अतिप्रसंगाचा प्रयत्न २० वर्षींय संशयिताला बेड्या; महिलांच्या लैंगिक शोषणाचे चार गुन्हे .... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : संशयित तरुणाने अल्पवयीन तरुणीचे तोंड दाबले आणि कोयत्याचा धाक दाखवून स्वतःच्या घरात ओढत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा सिनेस्टाईल प्रकार सातपूरच्या कामगारनगरमध्ये घडला असून, संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, महिलांच्या लैंगिक शोषणाचे चार गुन्हे दाखल झाले असून, या पोक्सोसह बलात्कार व विनयभंगाचे गुन्ह्यांचा समावेश आहे. .... पहिली घटना : लग्नाचे आमिष दाखवत महिलेशी सहा वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या संशयिताने तिच्या दागिन्यांचा अपहार करीत फसवणूक केली आहे. दानिश शकील मन्सूरी (रा. म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादीनुसार, संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच, तिचा विश्वास संपादन करीत तिच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून तिची फसवणूक केली. त्यावरून महिलेला दमदाटी व मारहाणही केली. ऑगस्ट २०२१ ते मे २०२६ या दरम्यान सदर प्रकार घडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. --- दुसरी घटना तरुणी अल्पवयीन असतानाही संशयिताने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध करीत तिला गर्भवती केले. याप्रकरणी संशयित लहू संपत खंदारे (२०, रा. दत्त चौक, गंगापूर रोड) याच्याविरुद्ध पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यान तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध केले. यामुळे तरुणी गर्भवती राहिली. याबाबत घरच्यांना सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. -- तिसरी घटना सीबीएसकडून कॉलेज रोडमार्गे घरी जात असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित संदीप यशवंत वाळके (४३), याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या दुचाकीवरून कॉलेज रोडने जात असताना, त्या कॉपी पावडर घेण्यासाठी थांबल्या. त्यावेळी संशयिताने त्यांचा हात पकडून त्यांना विनयभंग केला. -- चौथी घटना कामगारनगर येथे कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. सौरभ दीपक निंबाळकर (२०, रा. गणेश चौक, कामगारनगर) असे संशयिताचे नाव आहे. तरुणीच्या पालकाच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.१२) दुपारी संशयिताने तरुणीचे तोंड दाबून कोयत्याचा धाक दाखविला आणि त्याच्या घरात ओढून नेत कोंडून घेतले. त्यानंतर संशयिताने तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच, सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलिसात संशयिताविरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित निंबाळकर यास सातपूर पोलिसांनी बुधवारी (ता. १३) पहाटे अटक केली आहे. उपनिरीक्षक दहिफळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com