तंत्रस्नेही कुंभमेळा (भाग-७)

तंत्रस्नेही कुंभमेळा (भाग-७)
Published on
मेन फोटो: H19209, -- फोटो :H19210 आयफॉरमरिन टेक्नॉलॉजीस्‌चे सीईओ आलोक मुखर्जी, संचालक प्रकाश खानझोडे, राजा महबुबानी, सनी सेबॅस्टियन, संजीव अफझुलपूरकर. लोगो : टेक्नो कुंभ पंरपरा, तंत्रज्ञानाचा संगम ‘आयफोर मरिन टेक्नॉलॉजिस’ गोदातीरावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्‍वरला स्नान करतील. त्या वेळी नदीची स्थिती, पर्यावरणातील बदलावर लक्ष ठेवण्यासाठी ‘आयफॉरमरिन टेक्नॉलॉजिस’ या स्टार्टअपने प्रस्तावित केलेली ‘गोदामित्र स्मार्टबॉय’ प्रणालीविषयी. … स्टार्टअप काय आहे? -आयफॉर मरिन ही सागरी तंत्रज्ञान, जलनिरीक्षण प्रणाली आहे. यात स्वयंचलित बोट तंत्रज्ञान, पाण्याखालील रोबोटिक्स व पर्यावरणीय निरीक्षण या क्षेत्रात कार्य करणारी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप कंपनी आहे. … या प्रकल्पामागील संशोधक कोण? -गोदामित्र प्रणालीची संकल्पना आयफॉर मरिनच्या अभियांत्रिकी आणि संशोधन टीमने विकसित केली आहे. यामध्ये सागरी अभियांत्रिकी, इंडस्ट्रिअल डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स, जीआयएस, पर्यावरण सेन्सर प्रणाली आणि डेटा विश्‍लेषण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक मुखर्जी हे ‘डीआर डीओ’तील निवृत्त ज्येष्ठ रोबिटिक्स शास्त्रज्ञ आहेत. तसेच संचालक प्रकाश खानझोडे, राजा महबुबानी, सनी सेबॅस्टियन, संजीव अफझुलपूरकर यांचा समावेश आहे. संपूर्ण स्वदेशी डिझाईन आणि स्वदेशी उत्पादन भर ठेवून सुरू केलेला हा उपक्रम आहे. … ‘गोदामित्र स्मार्ट बॉय’ प्रणाली कशी कार्य करते? -या प्रणालीत नदीत तरंगणारे स्मार्ट बॉय वापरले जातील. विविध सेन्सर आणि कम्युनिकेशन प्रणालींनी सुसज्ज असू शकतात. त्यांच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता, नदीतील पाणीपातळी बदल, प्रवाहाची स्थिती, हवामानविषयक माहिती, गर्दीमुळे होणारे पर्यावरणीय परिणाम, जीपीएस आधारित स्थान यांची माहिती मिळेल. नदी परिसरासाठी डिजिटल सद्यःस्थितीची जनजागृती विकसित करेल. … यापूर्वी कोठे वापर झाला? -धरणे आणि जलाशयांचे सर्वेक्षण -स्वयंचलित जलवाहने -जलाशय निरीक्षण प्रणाली -पर्यावरणीय निरीक्षण संकल्पना -पाण्याखालील इमेज आणि निरीक्षण तंत्रज्ञान … कुंभमेळ्यात कसा उपयोग होवू शकतो? -कुंभमेळ्यात घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी नदीची सद्यःस्थिती आणि पर्यावरणीय बदलांविषयी ‘रिअल टाइम’ माहिती उपलब्ध असल्यास प्रशासनाला नियोजन व समन्वय साधण्यास मदत होते. -पाण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटकांवर सतत लक्ष ठेवता येते -नियंत्रण कक्षाला थेट डेटा उपलब्ध होतो -गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता, नदी सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद यामध्ये समन्वय साधणार -नदीच्या आरोग्याविषयी सतत उपयुक्त माहिती मिळते -धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक उपाययोजना म्हणून उपयोग … प्रशासनाला कशी मदत होवू शकते? -रिअल टाइम मॉनिटरिंग -जलद निर्णय प्रक्रिया -नदीस्थितीवरील अधिक स्पष्ट माहिती -विविध विभागांमधील समन्वय सुधारणा -आपत्कालीन तयारीस मदत -पर्यावरणीय माहितीचे संकलन -भविष्यातील नियोजनासाठी उपयुक्त माहिती -भविष्यात स्मार्टसिटी आणि स्मार्ट इव्हेंट व्यवस्थापनामध्ये या प्रणालीचा वापर होवू शकतो … कुंभापलीकडे दृष्टिकोन -नदी संवर्धन -स्मार्ट रिव्हरफ्रंट प्रकल्प -पूर निरीक्षण प्रणाली -धरण आणि जलाशय सुरक्षा -पर्यावरणीय डेटा प्रणाली पर्यटन आणि जलकिनारा व्यवस्थापन -आपत्ती व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com