तंत्रज्ञानाच्या मदतीने माता व बाल आरोग्य सेवांना बळ

तंत्रज्ञानाच्या मदतीने माता व बाल आरोग्य सेवांना बळ
Published on
19212 नंदूरबार : आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल. ------------------------------ उच्च जोखीम गरोदर मातांच्या ट्रॅकिंगसाठी विशेष पाऊल सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. १४ : जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी, तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेत विशेष प्रशिक्षण व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ''ई-सूची'' प्रणाली आणि ''हेल्थ ॲक्शन सेंटर''च्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर यावेळी भर देण्यात आला. बैठकीत ई-सूची प्रणाली अंतर्गत कुटुंब नियोजन सर्वेक्षण, माता आरोग्य मॉड्युल तसेच लाभार्थ्यांचे डिजिटल ट्रॅकिंग अधिक सक्षम करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे उच्च जोखीम गरोदर माता आणि उच्च जोखीम बालकांची वेळेत ओळख पटवणे, त्यांचा नियमित फॉलोअप घेणे, आरोग्य तपासणी आणि त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर चर्चा करण्यात आली. यासह आरोग्य नियंत्रण कक्षामार्फत जिल्हास्तरावरून नियमित मॉनिटरिंग करून आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविणे आणि प्रत्येक माता व बालक सुरक्षित व निरोगी ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून माता व बाल मृत्यू दर कमी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आदींसह सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com