कुत्रामालकावर गुन्हा दाखल

कुत्रामालकावर गुन्हा दाखल
Published on
अखेर कुत्रामालकाविरोधात भुसावळला गुन्हा दाखल --- कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी मुलाचा मृत्यू प्रकरण सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १४ : शहरातील नारायणनगर परिसरात पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नऊवर्षीय मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कुत्र्याचा मालक प्रकाश ऊर्फ खन्ना एकनाथ कोळी (रा. भिरुड कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भावना विशाल झोपे (वय ३६, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, नारायणनगर, भुसावळ, मूळ रा. गांधी चौक, वरणगाव) यांनी फिर्याद दिली. भावना झोपे यांचा मुलगा तारुष विशाल झोपे (वय ९ वर्षे ६ महिने) याच्यावर २४ एप्रिलला सकाळी साडेसहाच्या सुमारास कुत्र्याने हल्ला केला होता. भावना झोपे मुलाला स्कूलबसमध्ये सोडण्यासाठी घराबाहेर उभ्या होत्या. तारुष नेहमीप्रमाणे हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेला. दर्शन घेऊन परत येत असताना, संशयित प्रकाश ऊर्फ खन्ना कोळी यांच्या घरातील तपकिरी रंगाचा कुत्रा प्रवेशद्वारान बाहेर येत मुलावर झेपावला. कुत्र्याने तारुषला खाली पाडून चेहरा, तोंड, नाक व डाव्या डोळ्याजवळ अनेक ठिकाणी चावा घेतला. मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत ओरडत असताना, भावना व त्यांचे पती विशाल झोपे, अतुल पाटील, नीलेश सरोदे यांनी धाव घेत मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. संशयित प्रकाश कोळी पालिकेत कामाला असून, त्यांना कुत्रा हिंस्त्र स्वभावाचा असल्याची पूर्ण माहिती होती. संबंधित कुत्र्याला रेबीजचे लसीकरण केलेले नव्हते. कुत्र्याला साखळी किंवा मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले होते. हल्ल्यावेळी संशयिताने मुलाला वाचविण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या तारुषचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरात संतापाची लाट पसरली असून, मोकाट व पाळीव हिंस्त्र कुत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com