घाणेरी काढण्याच्या कामात गैरप्रकार; चौकशीची मागणी

घाणेरी काढण्याच्या कामात गैरप्रकार; चौकशीची मागणी
Published on
घाणेरी काढण्याच्या कामात गैरप्रकार; चौकशीची मागणी सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १४ ः पाटणादेवी (ता. चाळीसगाव) अभयारण्यातील घाणेरी वनस्पतीची झुडपे काढण्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. पाटणादेवीच्या जंगलात घाणेरी वनस्पती वाढल्यानंतर इतर झाडांना ती वाढू देत नाही. त्यामुळे घाणेरीची झाडे काढण्याचे काम वन विभागाने मजुरांमार्फत मार्चरपासून करण्यात आले. मात्र, ही झुडपे काढण्यासाठी ज्या मजुरांनी प्रत्यक्षात कुठलेही काम केलेले नाही, अशा मजुरांच्या बॅंक खात्यावर पैसे अदा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा होते, अशा मजुरांना नंतर बॅंकेत नेऊन त्यांना किरकोळ रक्कम देऊन उर्वरित रक्कम परस्पर हडप करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही रक्कम जवळपास लाखाच्या पुढे आहे. दरम्यान, या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. रहाटवळ यांना विचारणा केली असता, असा काही प्रकार घडला असेल तर त्याची आपण चौकशी करु असे त्यांनी सांगितले. -----------------------
Marathi News Esakal
www.esakal.com