संक्षिप्त पट्टा पान चार

संक्षिप्त पट्टा पान चार
Published on
संक्षिप्त महापालिकेतर्फे परिचारिकांचा गौरव जळगाव : महापालिकेच्या दवाखाना विभागातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८९ परिचारिकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांनी कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता बजावलेल्या अतुलनीय सेवेचे कौतुक केले. दरम्यान, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जळगाव महापालिकेचे नाव राज्यस्तरावर उंचावल्याबद्दल शहर क्षयरोग अधिकारी डॉ. वैभव भारती व त्यांच्या संपूर्ण पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, उपायुक्त पंकज गोसावी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ आणि डॉ. राम रावलानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रिया सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर संगीता महाले यांनी आभार मानले. --- शहरातील सोनीनगरात धम्मदेसना कार्यक्रम जळगाव : सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती व बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगल मैत्री चारिका भिक्षू संघातर्फे जिल्ह्यात १० ते १७ मे दरम्यान धम्मदेसना व भोजन दानाचा कार्यक्रम झाला. पिंप्राळा येथील सोनी नगरात मंगळवारी महागौतमी महिला संघ व तक्षशिला मित्र परिवारातर्फे येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोनीनगर परिसरात भिक्कू संघाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. भंते गुणरत्न महाथेरो, भंते प्रियबोधी, भंते जीवक, भंते उपाली, भंते सूर्यज्योती, भंते सागरबोधी,भंते धम्मरत्न,भंते आनंद,भंते शिलरत्न, भंते संघरक्षित यांचा सहभाग होता. यावेळी डॉ. बापू शिरसाठ, बी. ए. पानपाटील, डॉ. मिलिंद बागूल, आर. टी. सोनवणे, ज्योती निकम, संगीता भालेराव, सिंधू जाधव, अनिता साळवे, प्रियंका सुरवाडकर आदी उपस्थित होते. मुकेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आदी उपस्थित होते. ------- ‘इस्त्रो’च्या कार्यक्रमात ‘नूतन मराठा’ला यश जळगाव : येथील नूतन मराठा महाविद्यालयाने इस्रोच्या ''स्टार्ट'' (स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग) ऑनलाइन प्रोग्राम अंतर्गत अधिकृत सेंटरचे प्रमाणपत्र मिळवत यश संपादन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राबविलेल्या ''सायंटिफिक ऑब्झर्वेशन फ्रॉम स्पेस'' अभ्यासक्रमात महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी ''ए'' ग्रेडसह प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील व भौतिकशास्त्र विभागप्रमुखांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात अंतराळ विज्ञानाचे नवनवीन कोर्सेस उपलब्ध होतील. --- जळगावात ४५ पार पाऱ्यामुळे विजेचा खेळखंडोबा; शहरात रात्रीचे अघोषित ''लोड रिलीफ'' सुरू उपकेंद्रांवर ३० टक्के विद्युत भार वाढल्याने महावितरणचा निर्णय; रात्री ९ ते ३ वाजेदरम्यान नागरिक उकाड्याने बेहाल. जळगावकरांना रात्रीचा कडाका... उकाड्याचा! महावितरणकडून मध्यरात्री २ ते ३ तास वीज गुल सोमवारी रात्रीपासून विजेचा लपंडाव सुरूच; पिंप्राळा, महाबळ, शिवाजीनगरसह अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य. जळगावकरांची रात्र वैऱ्याची! शहरात मध्यरात्री अघोषित वीज कपात सुरू भीषण उकाड्यात जळगावकरांचा खोळंबा; शहरात रात्रीची वीज गायब! भररात्री जळगावकरांना घामाच्या धारा; महावितरणकडून अघोषित लोडशेडिंग सुरू यंत्रणा वाचवण्यासाठी जळगावात रात्रीचा वीज खंड; महावितरणचे अघोषित पाऊल जळगाव अंधारात! उपकेंद्रांवरील भार वाढल्याने रात्रीची अघोषित वीज कपात वीज बिलाचा शॉक आणि रात्रीचा उकाडा; जळगावात अघोषित लोड रिलीफचे संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com