श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्यक्रम

श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्यक्रम
Published on
NSK26H19220 जळगाव : श्री संत मुक्ताबाई तिरोभूत सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित कार्यक्रमात कीर्तन सेवेत सहभागी महाराज व त्यांचे सहकारी. ------ संत मुक्ताबाई तिरोभूतनिमित्त रंगले कीर्तन ---------- जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने श्री संत मुक्ताबाई पादुका मंदिर (मेहरुण) येथे श्री संत मुक्ताबाई यांच्या तिरोभूत (पुण्यतिथी) निमित्त भजन, कीर्तनादी कार्यक्रम पार पडले. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे संस्थानच्या वतीने श्री संत मुक्ताबाईंची ७२९ वी पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी, अर्थात मंगळवारी (ता.१२) साजरी करण्यात आली. पहाटे ५ ते ७ श्रीराम मंदिरात श्री संत मुक्ताईंच्या प्रासादिक पादुकांवर चंद्रभागा, गोदावरी, मेहुण येथून तापी- पूर्णा संगम तसेच गिरणा या पवित्र जलाने महाभिषेक करण्यात आला. मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानाजवळील श्री सद्‌गुरू अप्पामहाराजांना आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा दृष्टांत झाला, त्या पवित्र स्थळी संत मुक्ताबाई पादुका मंदिर येथे विविध कार्यक्रम झाले. १४-१ असे झालेत कार्यक्रम सकाळी ८ ते ९ या वेळात गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते पूजन, अभिषेक होऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त प्रस्थान होणाऱ्या श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे टपाल, पत्रिका पूजन झाले. वारकरी ह.भ.प. श्रीराम महाराज जळगावकर यांची ‘धन्य ते संसारी. दयावंत ते अंतरी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा झाली. श्रीराम मंदिरात सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान सामुदायिक श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, भजन, श्रीरामरक्षा स्तोत्र पठण होऊन, सायंकाळी आरती व नंतर भजन, कीर्तनादी सेवा झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहरुण येथील श्रीराम भजनी मंडळाने परिश्रम घेतले.
Marathi News Esakal
www.esakal.com