नगवाबारी पाणी गळती प्रश्‍न

नगवाबारी पाणी गळती प्रश्‍न
Published on
धुळे ः टुडे २ साठी -- फोटो क्रमांक ः 19241 धुळे : नगावबारी जलकुंभ परिसरातील पाणी गळतीची पाहणी करताना मायादेवी परदेशी. शेजारी महादेव परदेशी, ललित माळी, योगिता कुटे आदी. -- नगावबारी जलकुंभाची पाणीगळती थांबवा - महापौर परदेशी यांचे पाणीपुरवठा विभागाला पाहणीनंतर निर्देश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे नागरिक पाण्यासाठी वणवण करत असताना दुसरीकडे प्रशासकीय दिरंगाईमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाणे अक्षम्य आहे. नगावबारी परिसरातील ही पाणीगळती तातडीने दुरुस्त करा, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, अशा शब्दांत महापौर मायादेवी परदेशी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. देवपुरातील प्रभाग एकमधील नगावबारी एमबीआर जलकुंभ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीगळतीची समस्या कायम आहे. येथील एअर पाईप आणि सिमेंट पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी केली. - नागरिकांचा संताप सततच्या गळतीमुळे या परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. पाणीटंचाईच्या काळात ही नासाडी थांबवून आम्हाला कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. - कामात दिरंगाई नको पाहणी दरम्यान महापौरांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नवनीत सोनवणे यांना गळतीचे स्वरूप दाखवून दिले. कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच, गळतीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, नगरसेवक ललित माळी, नगरसेविका योगिता कुटे, नगरसेवक सुभाष जगताप, रणजित भोसले, स्वामी कुटे, पाणीपुरवठा अधिकारी सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com