खून प्रकरणातील संशयितास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खून प्रकरणातील संशयितास रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Published on
19251 नंदूरबार : महिलेच्या खूनप्रकरणात संशयितास अटक केल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी महिलेच्या खून प्रकरणी संशयितास अटक सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १४ : भिवंडी पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या महिलेच्या खून प्रकरणातील झारखंड येथील संशयित आरोपीस रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे आणि नंदुरबार पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून ही कारवाई केली. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. सदर महिलेचा खून झाल्याचे धागेदोरे भिवंडी गुन्हे शाखेला मिळाले होते. या खून प्रकरणातील संशयित हा भिवंडी येथून त्याच्या मुळ गावी झारखंड येथे जाण्यासाठी सुरत - भुसावळ एक्सप्रेसने पलायन करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजले होते. मोबाईल लोकेशनवरून भिवडी गुन्हे शाखेने संशयिताचा शोध घेण्यासाठी संपर्क साधला. त्यानुसार रेल्वे व नंदुरबार पोलिसांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर सापळा रचला. रेल्वे येताच पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन ताब्यात घेतले. व्दारका प्रसाद वर्मा (वय ३५, रा. झारखंड) संशयिताचे नाव आहे. सदर महिलेचा खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बंसत रॉय, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, मुजीब शेख, प्रकाश गोसावी, जितेंद्र चौधरी, राजेश घोराडे, रवींद्र जाधव तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे नंदुरबार येथील उपनिरीक्षक अमित यादव, प्रग्नेश मांगेला, प्रदीप भोईटे, मोंटू राम मिना यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com