धुळे ः टुडे १ साठी (पानाच्या डाव्या बाजूला)
--
फोटो क्रमांक ः 19248
मुंबई : वीजपुरवठाप्रश्नी मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी चर्चा करताना आमदार अनुप अग्रवाल.
--
धुळे शहराचा वीजप्रश्न शासनदरबारी
--
आमदार अग्रवाल यांची ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे रोहित्रांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : शहरासह देवपूर उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा थांबवून दोन दिवसांत ठोस उपाययोजना करा, असे कडक निर्देश आमदार अनुप अग्रवाल यांनी गुरूवारी (ता. १४) वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे जनक्षोभ उसळत असल्याने, हा प्रश्न आता आमदारांनी प्राधान्याने अजेंड्यावर घेतला आहे.
-
शहरातील विविध भागांत, विशेषतः देवपूर परिसरात वीज खंडित होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यंदा तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण आहेत. रात्री- अपरात्री वीज गुल होत असल्याने आबालवृद्धांचे हाल होत असून, यातून महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय नागठाणे यांची बैठक घेतली.
-
नियोजनाचा अभाव नको
आमदार अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. देवपूर, साक्री रोड, मिल परिसर यांसह अन्य भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. ठिकठिकाणी अतिरिक्त रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) उभारून लोड विभागला जावा, जुन्या उपकेंद्रांची क्षमता वाढवावी आणि पावसाळ्यापूर्वीची देखभाल- दुरुस्ती त्वरित पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. नवीन उपकेंद्रांसाठी जागेचा प्रश्न असल्यास महापालिका प्रशासनाशी तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भरत अग्रवाल, नगरसेवक अमोल मासुळे, प्रवीण अग्रवाल, विकी परदेशी, दिनेश पोतदार आदी उपस्थित होते.
-
१४-१
...चौकट...
१४-१
मंत्रालयातून चक्रे फिरली!
धुळ्याच्या वीज प्रश्नावर आमदार अग्रवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन साकडे घातले. शहरासाठी १०० व २०० केव्हीची अतिरिक्त रोहित्रे उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच, फीडर ट्रिपिंगची समस्या टाळण्यासाठी ५ एमव्हीएच्या ठिकाणी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे बसविण्याची विनंती केली. यावर मंत्री बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.