अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकरच्या वर आडवी -- अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा - किंवा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : देवपूर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्या प्रकाराचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पीडित मुलगी मसाल्याची पुडी देण्यासाठी भगत ऊर्फ कृष्णा सुभाष चित्ते याच्या घरी गेली. त्या वेळी संशयिताने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वारंवार त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संशयिताच्या सांगण्यावरून संतसेनानगर परिसरातील त्याच्या अल्पवयीन मित्रानेही पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार मे २०२५ ते १२ मे २०२६ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात संशयित दोघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com