आखाड्यांना हवे मल्टिपर्पज हॉल, शौचालये, हायमास्ट
त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांकडून कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक कामे सादर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येक आखाड्यांना पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांनी मल्टिपर्पज हॉल, शौचालयांची बांधणी, हायमास्ट, आखाड्यांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर आनुषंगिक कामांची यादी प्रशासनाला यापूर्वीच दिली आहे. साधारणत: २५ कोटींच्या कामांची यादी दिलेली असून, आता पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने आता प्रत्येक आखाड्याला वाढीव कामांमध्ये खोल्यांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे. आखाड्यांनी उपलब्ध जागा आणि त्यांची गरज याप्रमाणात कामे सुचविली आहेत. जागेची कमतरता भासणाऱ्या आखाड्यांनी पर्यायी जागेवर विकासकामे करण्याचा मार्ग निवडला आहे.
आखाड्यांनी सुचविलेली महत्त्वाची तीन कामे
१) महानिर्वाणी आखाडा - तीन कोटी ४८ लाख ७५ हजार
- सुरक्षा भिंत उभारणे : ४७ लाख
- आरसीसी हॉल बांधणे : ८० लाख
- नवीन शौचालय उभारणे : ९१ लाख
२) अटल आखाडा - एक कोटी ७७ लाख ६१ हजार
- आखाड्यातील कुंडांचा विकास - ३५ लाख
- नवीन बाथरुम, टॉयलेट - ७५ लाख
- रस्ता तयार करणे - १६ लाख
३) निरंजनी आखाडा - दोन कोटी ६८ लाख ५७ हजार
- इमारतीचे नूतनीकरण - ३० लाख
- नवीन शौचालय - ६५ लाख
- मल्टिपर्पज हॉल - ६५ लाख
४) आनंद आखाडा - तीन कोटी २५ लाख २३ हजार रु.
- कंपाउंड वॉल बांधणे - ६८ लाख
- आरसीसी इमारत बांधकाम - ९५ लाख
- नवीन शौचालय, पाण्याची टाकी - ६५ लाख
५) जुना आखाडा - दोन कोटी ५२ लाख २५ हजार
- नवीन शौचालय - ९० लाख
- पाण्याची टाकी - २५ लाख
- अंतर्गत रस्ते दुरुस्ती - ३८ लाख
६) आवाहन आखाडा - एक कोटी ८३ लाख ६१ हजार
- इमारतीची दुरुस्ती व रंगकाम - ३५ लाख
- आखाड्यांतर्गत रस्ते दुरुस्ती - ४४ लाख
- धर्मध्वज - १३ लाख
७) अग्नी आखाडा - एक कोटी १७ लाख ६१ हजार
- कंपाउंड वॉल - २० लाख
- शौचालय उभारणे - ६५ लाख
- आखाड्यांतर्गत ब्रिक्स बसवणे - १३ लाख
८) बडा उदासीन आखाडा - एक कोटी ६९ लाख ७५ हजार
- मल्टिपर्पज हॉल - ९५ लाख
- धर्मध्वज - १३ लाख
- रस्ते दुरुस्ती - १२ लाख
९) निर्मल आखाडा - दोन कोटी ६४ लाख ६१ हजार
- कंपाउंड वॉल - ३० लाख
- शौचालय उभारणे - ७५ लाख
- ड्रेनेज लाइन, पाण्याची टाकी - १५ लाख
१०) नया उदासीन आखाडा - तीन कोटी ९ लाख ३७
- सोलर वाटर हिटर - ३५ लाख
- नवीन शौचालय, सिवेज ड्रेनेज लाइन - ९५ लाख
- मल्टिपर्पज हॉल - ७० लाख
---
बोलके आकडे
धर्मध्वज - १.३० कोटी
रस्ते - २.४२ कोटी
विद्युत रोषणाई - ६७.२५ लाख
शौचालय उभारणे - ६.२१ कोटी
मल्टिपर्पज हॉल - ४.५ कोटी
पाणीपुरवठा - १.२० कोटी
इतर - ३ कोटी