दारूचा कारखाना उद्ध्वस्त

दारूचा कारखाना उद्ध्वस्त
Published on
धुळ्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त -- पत्री शेडमधील ''काळ्या धंद्या''चा पर्दाफाश; ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ ः शहरालगत वडजाई- नरव्हाळ रस्त्यावरील एका पत्री शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी दारूनिर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. १३) छापा टाकला. या कारवाईत तब्बल ८२ लाख ४६ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मद्यसम्राटांचे धाबे दणाणली आहेत. सुरत-नागपूर महामार्गाच्या दक्षिण बाजूला असलेल्या एका पडीक पत्री शेडमध्ये बनावट मद्य बनविले जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर अधीक्षक स्वाती काकडे यांच्या नेतृत्वात पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला. पथक पोहोचताच संशयितांनी तेथून पळ काढला. मात्र, शेडची झडती घेतली असता, तेथे सुरू असलेल्या मिनी कारखान्याचे स्वरूप पाहून अधिकारीही अवाक झाले. मोठा साठा जप्त छाप्यात नामांकित कंपन्यांच्या नावाने खपविली जाणारी बनावट दारू आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. यात देशी दारूच्या ६३०० बाटल्या, विदेशी मद्याच्या चार हजार ७०४ बाटल्यांसह पाच हजार लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरिट), एक हजार ७५० लिटर विदेशी आणि ५०० लिटर देशी ब्लेंड, तसेच ७६ हजार ५८० रिकाम्या बाटल्या, ३६ हजार बनावट लेबले आणि ५० हजार बूच जप्त करण्यात आले. यंत्रसामग्री, वाहन ताब्यात केवळ दारूच नव्हे, तर ती बनविण्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्यही जप्त करण्यात आले. यात तीन कॅपिंग मशीन, बाटल्या धुण्याचे मशीन, आरओ मशीन, इलेक्ट्रिक ब्लेंड मिक्सर, हायड्रोमीटर, थर्मामीटर आणि मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे पिक-अप वाहन (एमएच २३ एयू ४९०९) याचा समावेश आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक एस. एम. मोरे, दगडू पाटील, हेमंत घरटे, अनिल निकुंबे, जवान मनोज धुळेकर, दीपक अहिरराव, कल्पेश शेलार, सुरेश शिरसाळे, दारासिंग पावरा, नितीन पाटील, गौरव सपके, चालक विजय नाहीदे, भाग्यश्री पाटील यांनी केली. कोट छापा पडल्याचे लक्षात येताच संशयितांनी पळ काढला. मात्र, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, लवकरच मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जातील. जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरुद्ध ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. - स्वाती काकडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com