तिहेरी हत्याकांड प्रकरणी
आरोपीला ‘मरेपर्यंत’ फाशी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या पंचवटीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणात आठ वर्षांनंतर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. आई, मुलगी आणि अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळून ठार मारणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने ‘मरेपर्यंत फाशी’ची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. भन्साळी यांनी आरोपी जलालुद्दीन अलीमोहम्मद मलिक उर्फ खानसाहेब (रा. फुलेनगर झोपडपट्टी, पंचवटी) याला तिहेरी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर, पैरवी अधिकारी म्हणून अभियोग कक्षाचे उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, मधुकर पिंगळे, मनाेहर खंबाईत, विक्रांत नागरे, रशिद शेख, तनजीम खान यांनी पाठपुरावा केला.
नेमकं काय घडलं होतं?
- ६ ऑगस्ट २०१८ च्या पहाटे साडेचारला कालिकानगर, दिंडोरी रोड, पंचवटी
- फिर्यादी संगीता सुरेश देवरे यांच्या घरी आरोपी राहात होता. घर सोडण्यास सांगितल्याने आरोपी संतप्त झाला होता.
- येथून जाणार नाही, गेलो तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळून मारीन, अशी धमकी त्याने दिली होती.
- त्यानंतर आरोपीने पेट्रोलपंपावरून डिझेल आणले
- पहाटे घरात घुसून झोपलेल्या तिघींवर डिझेल टाकून पेटवून दिले हाेते.
- यात तिघींचा गंभीररित्या भाजून मृत्यू
या तिघींचा झाला दुर्दैवी मृत्यू
- संगीता सुरेश देवरे (वय ३८)
- प्रीती रामेश्वर शेंडगे (वय २०)
- सिद्धी रामेश्वर शेंडगे (वय ९ महिने)
भक्कम पुरावा
- या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक के. डी. वाघ, व्ही. डी. शार्दूल यांनी केला.
- तपासादरम्यान आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे.
- न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
---
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
- अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण, तत्कालीन सरकारी अभियोक्ता अनिल बागले यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.
- साक्षीदार, पंच आणि तपासातील पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी.