विद्यापीठात शैक्षणिक वर्षापासून

विद्यापीठात शैक्षणिक वर्षापासून
Published on
विद्यापीठात शैक्षणिक वर्षापासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपशीर्षक बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; लवकरच प्रवेशप्रक्रिया सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून रोजगाराभिमुख अनोख्या अभ्यासक्रमांना (प्रमाणपत्र आणि पदवी) सुरुवात केली जात आहे. या अभ्‍यासक्रमांना बारावी उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्यात येतील. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी व व्यवसायक्षम बनविण्यासाठी विद्यापीठातील प्रशाळांमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना येत्या शैक्षणिक वर्षपासून प्रवेश देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेंतर्गत बी.कॉम.(ऑनर्स), बीएफएसआय, रिटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बँकिंग, फायनान्स व विमा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. लाइफ सायन्सेस प्रशाळेत बी.एस्सी. ॲप्लाइड बायोलॉजी अभ्यासक्रम सुरू होत असून, कृषी जैव तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, औषधनिर्माण या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते. भौतिकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम सुरू असून, त्यास डेटा सायन्स, सौरऊर्जा प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. संगणकशास्त्र प्रशाळेतील बी.एस्सी.(ऑनर्स) कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आयटी), बँकिंग, सेवा क्षेत्र, शासकीय कार्यालये, विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळू शकतो. गणितशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (ऑनर्स), मॅथेमेटिकल सायन्स अभ्यासक्रम सुरू असून, त्यास आयटी क्षेत्र, शासकीय कार्यालये, विमा क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. बी.एस्सी. (अप्लाईड अर्थ सायन्सेस) या अभ्यासक्रमाद्वारे पर्यावरण व हवामानाशी संबंधित क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. कला व मानवविज्ञान प्रशाळेत विविध स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर बी.ए. (ह्यूमॅनिटीज- सिव्हिल सर्व्हिसेस) अभ्यासक्रम सुरू होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी/ यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळू शकते. एईडीपी अभ्यासक्रमांना प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष उद्योग व्यवसायात ॲप्रेंटिसशिप करावी लागणार असल्याने त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून शासनाच्या धोरणाप्रमाणे मोबदलाही मिळू शकतो. चारवर्षीय सोशल सायन्‍स अभ्‍यासक्रम सुरू बी.ए./बी.एस्सी.(लिबरल आर्ट) या नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला त्याची आवड असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची निवड करून शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे त्याला आवडत्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. सामाजिकशास्त्रे प्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी बी.ए. (ऑनर्स) सोशल सायन्स हा चारवर्षीय अभ्यासक्रम सुरू झाला आहे. विद्यार्थ्यास अर्थशास्त्र, इतिहास, संरक्षणशास्त्र, मानसशास्त्र व राज्यशास्त्र विषय घेता येतील. माध्यमशास्त्र प्रशाळेंतर्गत बी.ए. (मास कम्युनिकेशन- जर्नालिझम) अभ्यासक्रमाद्वारे पत्रकारिता, जाहिरात व कॉपोरेट क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com