जळगाव परिमंडलातील ६४ हजार घरांवर सौरऊर्जा

जळगाव परिमंडलातील ६४ हजार घरांवर सौरऊर्जा
Published on
सेकंड मेन बातमी घराच्या छतावरील सोलर वापरावे --- परिमंडलातील ६४ हजार घरांवर सौरऊर्जा ग्राहकांचा प्रतिसाद; सौर प्रकल्पातून २३५ मेगावॅट विजेची निर्मिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला जळगाव परिमंडलात मोठा प्रतिसाद मिळत असून, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ६४ हजारांहून अधिक वीजग्राहकांनी घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली उभारून विजेबाबत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. या ग्राहकांच्या घरांवर एकूण २३५ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे दरमहा १२० ते ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत असून, अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येत आहे. चौकट जळगाव जिल्हा आघाडीवर जळगाव परिमंडळात जळगाव जिल्ह्यात ४० हजार ३२७ ग्राहकांनी घरांच्या छातावर सौरऊजा प्रणाली बसवलेली आहे. यातून १४९.३९ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील १६ हजार ६३२ ग्राहकांनी ५९.३२ मेगावॅट तर नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार ४४५ ग्राहकांनी २६.३८ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com