विद्यापीठ महाविद्यालय कर्मचार्यांचे काळ्या फित लावून कामकाज

विद्यापीठ महाविद्यालय कर्मचार्यांचे काळ्या फित लावून कामकाज
Published on
NSK26H19271 जळगाव ः द्वारसभेदरम्‍यान निदर्शने करताना कर्मचारी. --- विद्यापीठ महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाने पुकारलेल्या संपाला राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत संपाचा इशारा दिला होता. त्‍यानुसार कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्‍या दुसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून काम केले. महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाने आंदोलन सुरू केले आहे. गुरुवार (ता. १४)पासून सुरू झालेल्या आंदोलनाचा शुक्रवारी (ता. १५) दुसरा दिवस होता. यात काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्‍यान, द्वारसभा होऊन महेश पाटील, राजू सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. तसेच, आपल्या मागण्यांबाबत भूमिका मांडली व आंदोलनाचे टप्पे जाहीर केले. द्वारसभेनंतर संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, मागासवर्गीय संघटनेचे सचिव अरुण सपकाळे, सहसचिव विठ्ठल धनगर, रेखा धम्मरत्न यांनी कुलगुरूंची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com