अंगणवाडीतील टिव्ही व इन्व्हर्टरची चोरी

अंगणवाडीतील टिव्ही व इन्व्हर्टरची चोरी
Published on
अंगणवाडी फोडली; टीव्हीसह सोलर लंपास नंदुरबार : शहादा तालुक्यातील सोनवल त.ह. येथे अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्याने टीव्ही व सोलर बॅटरी चोरी केल्याची घटना घडली. चोरट्याने प्लायवुडच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अंगणवाडीत प्रवेश केला. यामध्ये पाच हजार रुपये किमतीचा रंगीत टीव्ही व साडेसहा हजार रुपये किमतीची इन्व्हर्टरची सोलर बॅटरी असा एकूण ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी अंगणवाडी सेविका रेखा शामराव मालूसरे यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास युवराज पाटील करीत आहेत. ---
Marathi News Esakal
www.esakal.com