वाढत्या गुन्हेगारीच्या बिमोडसाठी खाकीने कसली कंबर

वाढत्या गुन्हेगारीच्या बिमोडसाठी खाकीने कसली कंबर
Published on
मेन बातमीला ही बातमी क्लब करावी ---- गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘खाकी’ने कसली कंबर गस्तीचा पॅटर्न बदलणार; पोलिस अधीक्षकांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : जिल्ह्यात घरफोडी, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता रात्रगस्त अधिक परिणामकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या घरफोडीच्या आणि मालमत्ता संबंधी गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्‍हा पोलिस दलातर्फे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पोलिसांच्या रात्रगस्तीबाबत करण्यात आलेले बदल असे... टार्गेट-बेस्ड कोम्बिंग ऑपरेशन्स गस्त म्हणजे केवळ फेरफटका नसून, ती आता ''निकालभिमुख'' असेल. गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील भागात सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून विशिष्ट टार्गेट्स दिले जातील, जेणेकरून संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई होईल. अनपेक्षित नाकाबंदी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रवेशद्वार आणि टोल नाक्यांवर ठराविक वेळी तपासणी करण्याऐवजी, आता ठिकाण आणि वेळ बदलून अचानक नाकाबंदी केली जाईल. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांच्या नियोजनाचा अंदाज बांधणे कठीण होईल. गुन्हेगारांवर ''वॉच'', हिस्ट्रिशीटर्सची तपासणी रात्र गस्त अधिकाऱ्यांकडे जेलमधून सुटलेले आरोपी, जामिनावर असलेले गुन्हेगार आणि फरार संशयितांची अद्ययावत यादी असेल. त्यांच्या वास्तव्याची आणि हालचालींची प्रत्यक्ष पडताळणी रात्रीच्या वेळी केली जाणार आहे. सतत बदलती गस्त, सायरनचा वापर पॅटर्न बदल : गस्तीची वेळ निश्चित न ठेवता ती सतत बदलती ठेवली जाईल. प्रतिबंधात्मक उपाय : निवासी भाग आणि एमआयडीसी क्षेत्रात पोलिसांच्या गाड्यांचे सायरन आणि अंबर दिवे वापरले जातील, जेणेकरून गुन्ह्यांना प्रतिबंध होईल आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल. सुरक्षा संवाद, प्रत्यक्ष पाहणी पोलिस आता केवळ रस्त्यांवरून न फिरता सोसायट्यांच्या वॉचमन आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधतील. बंद घरे, उघडी गेट्स किंवा खिडक्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना सतर्क करण्यावर भर दिला जाईल. तंत्रज्ञान आणि मालमत्ता सुरक्षा महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करणे आणि एटीएम केंद्रांना वारंवार भेटी देऊन त्यांची सुरक्षा तपासणे आता गस्त पथकासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. जिथे एमआयडीसी/ कारखाने आहेत तिथे विशेष पेट्रोलिंग राहील. चौकट वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण ''जिल्हा रात्र गस्त अधिकारी'' आणि विभाग स्तरावर ''डिव्हिजनल अधिकारी'' करणार आहेत. वरिष्ठ स्तरावरून होणाऱ्या या देखरेखीमुळे रात्र गस्त आता अधिक शिस्तबद्ध आणि प्रभावी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com