संक्षिप्‍त

संक्षिप्‍त
Published on
संक्षिप्‍त –– द्वारकानगर थांब्‍याजवळ गतिरोधकाची मागणी जळगाव : महामार्गाचे रूंदीकरण व कॉंक्रिटीकरण झाले असल्‍याने खोटेनगरपासून वाहने सुसाट वेगाने जात असतात. यातच द्वारकानगर थांब्‍याजवळ नागरिकांना उभे राहण्यासाठी देखील जागा नाही. वाहने वेगाने जात असल्‍याने येथे अपघाताची शक्‍यता अधिक निर्माण झाली आहे. यामुळे द्वारकानगर थांब्‍याजवळ गतिरोधक टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. चार दिवसांपूर्वी मानराज पार्क येथे दोन्‍ही बाजूंनी गतिरोधक टाकले. त्‍याच पद्धतीने द्वारकानगर थांब्‍याजवळ देखील गतिरोधक टाकावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. --- केबल टाकण्याच्‍या कामाला गती जळगाव : ‘महावितरण’कडून शहरातील अनेक भागात वीज तारा काढून केबल टाकण्याचे काम केले जात आहे. त्‍यानुसार निमखेडी शिवारातील अनेक भागात गेल्‍या महिनाभरापासून या कामाला सुरवात झाली आहे. त्‍यानुसार शिवधाम मंदिर परिसर, गजानन कॉलनी, आहुजानगर, मनुदेवी सोसायटी या भागात केबल टाकण्याचे काम पूर्णत्‍वास आले असून, आता द्वारकानगर, स्‍वामी समर्थ कॉलनी या भागात देखील सुरवात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com