संघातर्फे सभासदांचा सत्कार

संघातर्फे सभासदांचा सत्कार
Published on
चैतन्य महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : येथील चैतन्य महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ७० वर्षावरील महिला सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय चौधरी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण धांडे होते. उपाध्यक्ष प्रा. आर. व्ही. मोते, डॉ. लीना पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले. नंतर सानेगुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म’ उषा सोनावणे व सरला बोरोले यांनी सादर केली. संघाच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी संस्थेने केलेल्या कामाजाविषयी माहिती दिली. ज्येष्ठ सदस्या ललिता महाजन यांनी ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. लीना पाटील यांनी आरोग्य, आहार, मधुमेह, व निरोगी आयुष्य कसे जगावे, यासाठी काही योगासने प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले. ॲड. धांडे, प्रा. मोते, श्री. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. नवीन कार्यकारिणी अशी २०२६ ते २०२९ साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षा भारती पाटील, उपाध्यक्षा पुष्पा पाटील, सचिव विद्या सोनावणे, मागील कार्यकारिणी सदस्य या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. रत्ना बागुल यांनी सूत्रसंचालन केले. विद्या सोनवणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com