मेन फिचर टुडे पान ३
---
NSK26H19272
जळगाव : जिल्हा व्याघ्र कक्षाची बैठक शुक्रवारी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, बैठकीत उपस्थित समिती सदस्यांशी संवाद साधताना श्री. धिवरे व अधिकारी.
--------
वनक्षेत्रातील वृक्षतोड, गांजा लागवडीवर ‘ड्रोन’ची नजर
उपशीर्षक
व्याघ्र कक्ष समिती बैठकीत निर्णय; वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात व्याघ्र कक्षाची (टायगर सेल) बैठक शुक्रवारी (ता.१५) पार पडली. वनक्षेत्रात प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यासह वन विभागाच्या जमिनीवर गांजा लागवड होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना करणे, पोलिस व वन विभाग यांनी संयुक्तपणे गस्त वाढविणे आदी महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे व्याघ्र कक्ष व त्यासंबंधी समिती स्थापन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित या समितीची बैठकच झाली नव्हती.
हा आहे उद्देश
व्याघ्र कक्षाच्या स्थापने संबंधात महसूल आणि वने विभाग महाराष्ट्र शासनाचे दोन अध्यादेश आहेत. वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी हा शासन निर्णय जारी केला आहे. वाघ व इतर वन्यप्राण्यांची अवैध शिकार, त्यांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर विशेष व्याघ्र कक्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वन्यजीवांचे वाढते धोके लक्षात घेऊन विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि प्रभावी नियंत्रण ठेवणे हा या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
----
(चौकट)
कक्षात यांचा आहे समावेश
समितीत अध्यक्ष पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपाध्यक्ष म्हणून उप वनसंरक्षक राम शंकर धोत्रे, सदस्य म्हणून यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक सौरीष सहाय, नाशिक येतील उप वनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक (मृदा), अमोल चव्हाण, वन्यजीव विभागाचे वनाधिकारी श्रीमती रेवती कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर), स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे निरीक्षक राहुल गायकवाड, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एस.जी. धांडे आदींचा समावेश आहे.
-----------
(चौकट)
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- वनक्षेत्रात जास्त पाणवठे तयार करावे
- वन जमिनीवर गांजा लागवड होऊ नये म्हणून उपाययोजना करणे
- या भागात संयुक्तपणे गस्त वाढवावी, ड्रोनचा उपयोग करणे
- वृक्षतोडीवर कठोर उपाययोजना, प्रसंगी मोठी कारवाई
- वन अधिकाऱ्यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देणार
- वनक्षेत्रातील उघड्या विहीरींना झाकण करणार
- मध्य प्रदेश सीमेवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण
----------------