शेतातील लाकडे जाळल्याने मारहाण

शेतातील लाकडे जाळल्याने मारहाण
Published on
शेतातील लाकडे जाळल्याने मारहाण नंदुरबार : तालुक्यातील शेही शिवारात शेतातील बोरीच्या झाडांची लाकडे जाळल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश रूबजी वळवी हे शेतात ट्रॅक्टरने फणी मारत असताना त्यांनी तेथील बोरीच्या झाडांची लाकडे जाळली. ‘शेतात लाकडे का जाळली?’ अशी विचारणा करत संशयित बनू वळवी याने सुरेश यांना लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच ‘पुन्हा शेतात आल्यास हातपाय तोडून टाकेन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पोलिस नायक शिवाजी वसावे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com