पान-१ ॲंकर
----------------
तानाजी केकरे NSK26H19273
-----------------
‘तानाजी कडा’ मोहीम साडे नऊ मिनिटात फत्ते
-------------
दोर, उपकरणांची मदत न घेता आंबेवाडीच्या तानाजी केकरे याचा विक्रम
------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ ः इगतपुरी जवळील आंबेवाडी या आदिवासी गावातील तानाजी केकरे या युवकाने अवघ्या ९ मिनिट ३० सेकंदात डोढागिरी (तानाजी कडा) ची मोहीम फत्ते केली. हा विक्रमच तानाजीच्या नावावर नोंदवला गेला आहे.
सिंहगडाचे नाव घेतले की शिवकाळातील महापराक्रमी तानाजी मालुसरे आठवतात. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन काळोखात डोढागिरी कडा चढून उदयभानकडून कोंढाणा ताब्यात घेतला होता. या लढाईत त्यांना वीरमरण आले. हा डोढागिरी पुढे तानाजी कडा म्हणून ओळखला जाऊ लागला. आजवर अनेक गिर्यारोहकांनी हा कडा सर केला आहे, परंतु तानाजीने तो साडे नऊ मिनिटात सर केला. विशेष म्हणजे यासाठी त्याने कोणताही दोर किंवा तांत्रिक उपकरणाचा वापर केला नाही.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तानाजीने डोढागिरी सर केला. या मोहिमेसाठी त्याला महाराष्ट्र रेंजर्स प्रस्तरारोहण संस्थेचे प्रदीप गायकवाड, अखिल शेळके, सुनील येवले, मिलिंद गायकवाड, सूजल शिंदे इत्यादी सहकार्य लाभले. हा तानाजी कडा विक्रमी वेळेत सर केल्याबद्दल गिर्यारोहण क्षेत्राकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
---
१६-१
तानाजीने केलेत इतर विक्रम
तानाजी केकरे याच्या नावावर आत्तापर्यंत अनेक विक्रम आहेत. यात लिंगाणा किल्ला ११ मिनिटे २२ सेकंद, अलंग मदन कुलंग हे त्रिकूट ३ तास १२ मिनिटांमध्ये, कळसूबाई सर्वोच्च शिखर ३८ मिनिटे १४ सेकंदात, बाण सुळका ९ तासांमध्ये अल्पाईन पद्धतीने सर, तर हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा अडीच दिवसांमध्ये अल्पाईन पद्धतीने क्लाइंबिंग केलेला आहे.
---
कोट
वरून पाहिले तर तानाजी कड्याची खोली छाती दडपून टाकणारी आहे. अक्षरशः अंगावर काटा आणते. हा कडा चढणे सोपे काम नाही. परंतु सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम स्मरण करून मी आव्हान स्वीकारले व यशस्वी करून दाखविले. लहानपणापासून डोंगर चढण्या- उतरण्याची सवय असल्याने हे श्रेय सह्याद्रीचे आहे.
- तानाजी केकरे, गिर्यारोहक.
---------------