जागतिक अनिश्चिततेच्या काळात
जैन इरिगेशनची दमदार कामगिरी
उपशीर्षक
चौथ्या तिमाहीतील परिणाम; भविष्यातही संधी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम कामगिरी नोंदवली आहे.
जैन हिल्स येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर चौथ्या तिमाहीचा निकाल जाहिर करण्यात आला. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ‘हाय-टेक’ आणि ‘ॲग्रो प्रोसेसिंग’ विभागांच्या मजबूत कामगिरीमुळे कंपनीने वार्षिक तुलनेत ४.३ टक्के एकत्रित महसूल वाढ नोंदवली. प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीने २३३ कोटी रुपयांची रोख निर्मिती केली असून, ती EBITDA च्या जवळपास ९७ टक्के इतकी आहे.
कंपनीने एकत्रित महसुलात दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील एकत्रित EBITDA ८०९ कोटी रुपये इतका असून, तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२.८ टक्क्यांनी अधिक आहे.
-----
NSK26H19275 (अनिल जैन)
कोट..
कच्च्या मालाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवाहावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी धोरणांमधील सातत्य तसेच सिंचन आणि पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च यामुळे बाजारातील मागणीला चालना मिळेल असे अपेक्षित आहे.
- अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक
-----------