औषध विक्रेत्यांचा

औषध विक्रेत्यांचा
Published on
संक्षिप्त औषध विक्रेत्यांची २० मेस बंदची हाक जळगाव, ता. १५ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी २० मे रोजी देशात व राज्यात बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. त्यामुळे शहरातील जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य यांची आगाऊ व्यवस्था करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औषध प्रशासन व पोलिस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासनाने केमिस्ट बांधवांना आवाहन केले आहे की, या बंदमध्ये सहभागी होऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार (९४२२३५६१४३) व श्रीमती क. र. पाटील (९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधावा. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com