बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी
७४५ पदांची भरती; नामांकित कंपन्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ ः जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी चालून आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे १९ आणि २१ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी दिली आहे.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती कमलाताई माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी (ता. १९) सकाळी मेळावा होईल. यामध्ये ७४५ पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार आहे. यात अदाणी सोलार, अस्तिमो इंडिया, रेमंड, बोस्च आणि नवभारत फर्टिलायझर्स यांसारख्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि जिल्हा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २१) सकाळी दहाला वाजता शहरातील एम. के. डी. कॉलेज येथे विशेष प्रशिक्षण व भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
--