धुळे ः टुडे १ साठी, मेन
---
फोटो क्रमांक ः 19287 (संग्रहित).........(फक्त सिंगल कॉलम वापरावा)
---
उष्मामुळे धुळे जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट!
मेच्या तडाख्याने स्त्रोत तळ गाठू लागल्याने चिंता; बाष्पीभवनाचा वेग वाढला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः मेच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनली आहे. वाढत्या तापमानामुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जिल्ह्याचा एकूण पाणीसाठा आता ४३.१३ टक्क्यांवर आला असून, आगामी काळात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीच्या नियोजनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (ता. १५) प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अनेक प्रकल्प आता तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. गेल्या वर्षी याच काळात जलसाठा ४३ टक्क्यांच्या आसपास होता. मात्र, यंदा वाढत्या उष्णतेने बाष्पीभवनाचा दर वाढल्याने उपलब्ध साठाही वेगाने कमी होत आहे.
बाष्पीभवनाचा विळखा
जिल्ह्यात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. अनेक गावांमधील विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मध्यम प्रकल्पांत साठा
जिल्ह्यातील स्थिती पाहता सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सध्या १५५.४६४ दलघमी (४३.१३ टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. यात मुकटी (नकाणे तलाव) प्रकल्पात ७.१४ दलघमी (७०.०५ टक्के) जलसाठा असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा ९.२० टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, अन्य मध्यम प्रकल्पांची पातळी वेगाने खाली जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लघु प्रकल्पांची अवस्था
जिल्ह्यातील ४५ लघु प्रकल्पांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४०.३१३ दलघमी म्हणजेच ३१.९७ टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. हा साठा पिण्यासाठी आणि शेतीसाठी अपुरा पडण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.
पाणी काटकसरीने वापरा
जिल्ह्याचा एकूण जलसाठा सध्या १९५.७७७ दलघमी (४३.१३ टक्के) आहे. मॉन्सून येईपर्यंतचे काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. उन्हाची तीव्रता अशीच कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी मोठी घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतीसाठीच्या पाण्याचेही नियोजनबद्ध वाटप करण्यावर पाटबंधारे विभागाचा भर आहे.
---
१४-१
चौकट
दृष्टिक्षेपात एकूण जलसाठा
उपयुक्त साठा : ४३.१३ टक्के
मध्यम प्रकल्प (१२) ः ४७.४२ टक्के
लघु प्रकल्प (४५) : ३१.९७ टक्के
सर्वाधिक साठा ः नकाणे (७०.०५ टक्के)
--
१४-१
चौकट
प्रमुख जल प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प ...............उपलब्ध (दलघमी) ........ साठा
सुलवाडे.............४२.७५......................६५.७१ टक्के
अक्कलपाडा........२५.२६......................५७.७१ टक्के
वाडीशेवाडी.........१९.६३......................५७.८७ टक्के
अनेर................२३.४८......................४७.६६ टक्के
जामखेडी............५.५७.......................४५.१४ टक्के
पांझरा...............१३.७६......................३८.६२ टक्के
बुराई.................४.५०.......................३१.६७ टक्के
मालनगाव...........३.५६........................३१.४२ टक्के
कनोली..............२.५०........................२९.५९ टक्के
अमरावती...........५.९२........................२७.८६ टक्के
करवंद...............५.०७........................२७.७७ टक्के
सोनवद..............३.४७........................२४.१६ टक्के