धुळे रेशनकार्डचा प्रश्‍न

धुळे रेशनकार्डचा प्रश्‍न
Published on
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर --- लोगो छायाचित्र ः 19286 --- तांत्रिक चुकीने नाशिकला नावे गेलेल्या दुरुस्तीची पुन्हा संधी रेशनकार्डचा प्रश्‍न ः धुळे तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन; २२ मेपर्यंत मुदत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : शहर व परिसरातील रेशनकार्डांमध्ये ज्या नागरिकांची नावे तांत्रिक चुकीमुळे किंवा इतर कारणांमुळे ऑनलाइन प्रणालीत नाशिक विभागात वर्ग झाली आहेत, अशा नागरिकांना ती नावे पुन्हा धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडे स्थलांतरित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकारातील नागरिकांनी १८ ते २२ मे यादरम्यान धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील टपाल शाखेत अर्ज सादर करावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत असणार आहे. धुळे शहरात वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे मूळ रेशनकार्डात आहेत; मात्र ऑनलाइन पडताळणीत ती तांत्रिक त्रुटीमुळे नाशिक जिल्हा पुरवठा विभागाच्या अंतर्गत नोंदविली गेल्याचे समोर आले आहे. परिणामी, संबंधित नागरिकांना हक्काचे स्वस्त धान्य आणि इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. एवढेच नव्हे तर, ऑनलाइन शिधापत्रिकेत नावे नाशिकला दिसत असल्याने केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘आयुष्मान भारत कार्ड’ आणि ‘आभा कार्ड’ नोंदणीतही मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे गरिबांना आरोग्य योजनांचा लाभ मिळणे कठीण झाले असून, नागरिकांमधून याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. हाती विशेष मोहीम या गंभीर समस्येची दखल घेत आमदार अग्रवाल यांनी धुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार धुळे ग्रामीण तहसील कार्यालयामार्फत ही नावे पुन्हा धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडे नोंदविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी अर्ज जमा केल्यानंतर धुळे शहर व जिल्हा पुरवठा विभागातर्फे योग्य ती पडताळणी करून संबंधित सदस्यांची नावे धुळे पुरवठा विभागात समाविष्ट करण्याची तत्काळ कार्यवाही केली जाईल. --- कोट फोटो क्रमांक ः 19285 गेल्या वर्षीही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमेतून सुमारे ५०० हून अधिक नागरिकांची नाशिकला गेलेली नावे पुन्हा धुळे पुरवठा विभागात यशस्वीपणे समाविष्ट करण्यात आली होती. नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाही ही मोहीम राबवली जात असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज प्रक्रियेत काही अडचण आल्यास नागरिकांनी एबी फाउंडेशनचे समन्वयक दत्तात्रय पारखे (मो. ९११२२ २९२३८) यांच्याशी संपर्क साधावा. - अनुप अग्रवाल, आमदार, धुळे --- १४-१ चौकट कार्यवाहीचे वेळापत्रक अर्ज करण्याची मुदत : १८ मे ते २२ मे वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत ठिकाण : टपाल शाखा, धुळे ग्रामीण तहसील कार्यालय आवश्यक कागदपत्रे : तहसीलदार (धुळे ग्रामीण) यांच्या नावे अर्ज, आधारकार्डची प्रत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com