अँकर
--
फोटो : NSK26H19292
धडगाव : येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आदी.
-------------------
दुर्गम भागातील नागरिकांना घरपोच शासकीय सेवा
धडगावात माता-बाल आरोग्य आणि पोषण योजनांना मिळणार गती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : दुर्गम व आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य, पोषण आणि अंगणवाडी सेवांच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्यासाठी धडगाव येथे नव्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. विधान परिषद आमदार आमश्या दादा पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी संगीता नाईक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या कार्यालयामुळे धडगाव, खुंटामोडी आणि तोरणमाळ प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या योजनांना नवे बळ मिळणार आहे.
केंद्र भविष्यात नागरिकांसाठी एक आदर्श सेवा केंद्र ठरेल, अशी आशा व्यक्त करत उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांचे आभार मानण्यात आले.
--
प्रशासनाचा लोकहिताचा संकल्प
उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी प्रशासनात संवेदनशीलता, शिस्त आणि लोकहिताची जाणीव बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यालयामार्फत बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य आणि अंगणवाडी सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी दिला.