NSK26H19290
जळगाव : पद्मालय विश्रामगृहात सर्व विभागांच्या आढावा बैठकीत बोलताना आमदार सुरेश भोळे. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग.
...........
नागरिकांना उत्तर देण्यासाठी जबाबदार अधिकारी कुठे?
आमदार भोळे : ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना रात्री उपकेंद्रांवर हजर राहण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरात वाढत्या उष्णतेमुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात वीजेची कमतरता नाही, मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी रात्रीच्या वेळी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपकेंद्रांवर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
शहरातील वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत पद्मालय विश्रामगृहात महावितरण आणि महानगरपालिका, न्हाई, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार भोळे यांनी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. यावेळी शहरातील वाढत्या वीजभाराचा आढावाही घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उष्णतेमुळे वीजेची मागणी झपाट्याने वाढत असल्याने नवीन वीज उपकेंद्रांची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार शहरात प्रस्तावित तीन नवीन सबस्टेशन्सचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी गती देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी महावितरण व मनपाचे पाणीपुरवठा विभागाने समन्यवयाने काम करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
जबाबदार अधिकारी असावे
रात्री वीज गेल्यानंतर नागरिकांचे सतत फोन येतात. मात्र उपकेंद्रात अधिकारी उपलब्ध नसतात आणि फोनही उचलले जात नाहीत. ही परिस्थिती गंभीर असून यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर जबाबदार अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या.
वीजभार वाढला
महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही शहरातील अतिभारित ट्रान्सफॉर्मर, वाढलेला ‘पीक लोड’ आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार भोळे यांनी बैठकीत दिले.
सर्कलमध्ये फलक नको
महामार्गावरील चौकांमध्ये सर्कलमध्ये विविध राजकीय पक्षाचे तसेच जाहिरातींचे फलक लागत असल्याने वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. त्याबाबत आमदार भोळे यांनी न्हाईचे अधिकारी यांना सर्कलमध्ये जाहिरीत फलक यापुढे लागले नाही पाहीजे असे सूचना दिल्या. तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून रस्ते दुरुस्ती व अपूर्ण रस्त्यांचे कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार भोळे यांनी दिल्या.