निर्यातीवरही परिणाम
-वाहतूक खर्चात वाढ होईल
-उत्पादन खर्च वाढेल आणि ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम
-डॉलरची किंमत ९५ रुपयांवर गेल्याने आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ
-उद्योगांसाठी आवश्यक ऑईलच्या किमतीत ८० टक्के वाढ झाल्याने वस्तूंच्या किमतीत भर
जहाजांचे भाडे वाढल्याने निर्यातीत घट
-औद्योगिक वस्तूंसह कृषिमालाच्या निर्यातीवरही परिणाम
-पेट्रोलियम वस्तूंच्या किंमती वाढणार
….
शासनाकडून अपेक्षा
-शासनाने पेट्रोलच्या किमतीवर नियंत्रण ठेवायला हवे
-रुपयाचे अवमूल्यन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी
-आर्थिक मंदी येणार नाही, यादृष्टीने सकारात्मक पावले उचलावित
-यापुढील काळात परिस्थिती अधिक बिघडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी
…कोट
युध्दजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर वाढण्याची शक्यता होती. सध्याची दरवाढ थेट परिणामकारक नसली तरी भविष्यासाठी चिंताजनक आहे. भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होवू नये, यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करायला हव्या.
-आशिष नहार, अध्यक्ष, निमा
--कोट
महागाई वाढण्याची शक्यता असून भविष्यात आर्थिक मंदी येवू शकते. पेट्रोलियम वस्तूंच्या उत्पादनाची किंमत वाढल्यास वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. समाजातील सर्वच घटकांवर याचा थेट परिणाम होईल.
-राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा