बाजार समिती

बाजार समिती
Published on
जळगावच्या बाजार समिती सभापती निवडीवर एकमत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : येथील बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक येत्या सोमवारी (ता. १८) होणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांनी येथील अजिंठा विश्रामगृहात बाजार समितीच्या संचालकांची बैठक शुक्रवारी (ता. १५) घेतली. तीत सभापतींच्या नावावर प्राथमिक चर्चा झाली. बाजार समितीत महायुतीचा सभापती होणार असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी चर्चा करून अंतिम उमेदवाराचे नाव निश्‍चित होईल. सभापती सुनील महाजन यांच्याविरोधात १२ संचालकांनी अविश्‍वास ठराव दाखल केल्यानंतर ९ मेस महाजन यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बाजार समितीच्या १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन महाजन यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. या गटात श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज चौधरी, पल्लवी देशमुख यांसारख्या प्रमुख संचालकांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सभा बोलावली जाणार होती. या सभेत बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर होते. मात्र, विरोधी गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदानाला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. महाजन यांच्या राजीनाम्यानंतर आता बाजार समितीचा सभापती कोण? संचालक लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर, संचालक मनोज चौधरी यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com