''डीएपी''चा हेका सोडा

''डीएपी''चा हेका सोडा
Published on
धुळे ः टुडे १ साठी --- लोगो छायाचित्र ः समर्पक वापरावे --- ‘डीएपी’चा हेका सोडा, पर्याय उपलब्ध कृषी विभागाचे आवाहन; जिल्ह्यात खरीप हगांमानिमित्त तयारी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ ः येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ ‘डीएपी’ खतावर अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रभावी पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यासह जिल्ह्यात लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून, या काळात ‘डीएपी’ खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, बाजारातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर संयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे आहे, असे कृषी यंत्रणेने कळविले आहे. महाराष्ट्र राज्य सध्या मृद परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात देशात अग्रेसर आहे. याच प्रणालीचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी संतुलित खत वापराकडे वळणे फायदेशीर ठरेल. ‘डीएपी’ला उत्तम पर्याय ‘डीएपी’ खतामध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद ही मुख्य अन्नद्रव्ये असतात. हीच मात्रा इतर खतांच्या योग्य समन्वयातून मिळविणे सहज शक्य आहे. यात पर्याय क्रमांक १ (एसएसपी + युरिया)- ‘डीएपी’च्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोण्या ‘एसएसपी’ (सिंगल सुपर फॉस्फेट) वापरल्यास पिकांना ‘डीएपी’ इतकेच पोषण मिळते. ‘एसएसपी’ देशांतर्गत तयार होत असून, त्यात १६ टक्के स्फुरद, सल्फर आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फर अत्यंत फायदेशीर ठरते. पर्याय क्र. २ (टीएसपी + युरिया)- ''टीएसपी'' खतामध्ये ४६ टक्के स्फुरद असते. त्यामुळे ''डीएपी''च्या एका गोणीऐवजी एक गोणी ''टीएसपी'' आणि अर्धी गोणी युरिया वापरणे हा देखील उत्तम पर्याय आहे. संयुक्त खतांचा वापर केवळ नत्र आणि स्फुरद यांवर भर न देता पिकांना पालाश मिळवून देण्यासाठी संयुक्त खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे बाजारात विविध संयुक्त खते उपलब्ध आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने सल्ला दिला आहे, की या संयुक्त खतांच्या वापरामुळे पिकांना नत्र आणि स्फुरद सोबतच ''पालाश'' हे महत्त्वाचे अन्नद्रव्यही मिळते. परिणामी, पिकांची वाढ जोमदार होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी बाजारात ''डीएपी''साठी न अडकता उपलब्ध पर्यायी खतांचा सुज्ञपणे वापर करावा. --- १४-१ चौकट उपलब्ध संयुक्त खते एनपीके १०:२६:२६ एनपीके २०:२०:०:१३ एनपीके १२:३२:१६ एनपीके १५:१५:१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com