धुळे टुडे २ साठी ॲंकर
---
फोटो- NSK26H19307
धुळे ः शहरातील तिरंगा चौक भागात पुरपोळ्या विक्री करताना आकाश सोनवणे.
---
मुस्लिमबहुल भागात ‘आकाश’च्या पुरणपोळ्यांचा ‘गोडवा‘
सत्तर टक्के अंधत्व असलेल्या मालेगावातील तरुणाचा धुळ्यात व्यवसाय
अशपाक खाटीक ः सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः सत्तर टक्के अंधत्व असलेला मालेगाव येथील तरुण धुळ्यात मुस्लिमबहुल भागात येऊन पुरणपोळी विक्रीचा व्यवसाय करतो. यातून तो आपल्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. त्याची ही जिद्द व मेहनत इतर अनेक बेरोजगारांसाठी प्रेरणा देणारी आहे.
मालेगावच्या संगमेश्वर पवननगर येथील सरोजा सोनवणे यांनी १३ वर्षांपूर्वी धुळे शहरातील मुस्लिमबहुल भाग असलेल्या तिरंगा चौकातील एका कोपऱ्यात पुरणपोळी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. एका टोपलीत थोड्याशा पुरणपोळ्या घेऊन त्या येत. त्यांच्या पुरणपोळीची चव चांगली असल्याने काही दिवसांतच ग्राहक वाढू लागले. एका दिवसात ५० पुरणपोळ्या विक्रीच्या व्यवसायाने कधीच दोनशेचा टप्पा ओलांडला हे त्यांनाही कळले नाही. पुरणपोळी विक्रीचा हा व्यवसाय नंतर आकाश सोनवणे याने सांभाळला. आकाशला ७० टक्के अंधत्व आहे. त्याला एका डोळ्याने दिसत नाही. त्याचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. आपल्या ७० टक्के अंधत्वावर मात करत त्याने परिस्थितीशी दोन हात करत जिवनात पुढे जाण्याचे ठरविले. तो मालेगाव येथून सकाळी २०० पुरणपोळ्या घेऊन सकाळी नऊपर्यंत धुळे गाठतो. धुळ्यातील तिरंगा चौकात टेबल खुर्ची टाकून तो ‘चौधरी पुरणपोळी सेंटर''च्या माध्यमातून पुरणपोळी विक्रीचा व्यवसाय करतो. एक पुरणपोळी ५० रुपये या दराने तो विकतो. दुपारी दोनपर्यंत त्याच्या २०० पुरणपोळ्या विक्री होतात. दोननंतर तो परत मालेगाव गाठून दुसऱ्या दिवसाची तयारी करतो.
ग्राहक वाट पाहतात
फेब्रुवारी ते जुलैदरम्यान रोज २०० पुरणपोळ्या विक्रीसाठी लागतात. यात आठवड्यातून शुक्रवारी व रविवारी ४०० पुरणपोळ्या विक्रीसाठी लागतात. मुस्लिम भागात आकाशची पुरणपोळी प्रसिद्ध असल्याने ग्राहक त्याची सकाळ पासूनच आतुरतेने वाट पाहात असतात. आकाशची पुरणपोळी मुस्लिमबांधव आपल्या नातेवाइकांनाही पाठवत असतात.
---
कोट
कुणाकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतः चा व्यवसाय करणे कधीही चांगले. माझ्या पुरणपोळ्या ग्राहकांनी थेट दुबईपर्यंतही नेल्या आहेत, तर काहीजण सुरतपर्यंत आपल्या नातेवाइकांना पुरणपोळ्या पाठवत असतात. ग्राहकांचे समाधान हेच माझ्या व्यवसायाचे यश आहे.
- आकाश सोनवणे