चांदीत पुन्हा १९ हजारांची घट
---
सोन्याच्या भावात २,५०० ची घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावाने गुरुवारी (ता. १४) उसळी घेतली होती. मात्र, शुक्रवारी (ता. १५) सोन्याच्या भावात दोन हजार ५००, तर चांदीत १९ हजारांची घसरण झाली.
जळगावच्या सराफा बाजारात शुक्रवारी (ता. १५) सोन्याच्या भावात अडीच हजारांची घट झाली. सोने एक लाख ५७ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) पोहोचले. गुरुवारी (ता. १४) चांदीचे भाव दोन लाख ८५ हजार (प्रतिकिलो) होते. शुक्रवारी त्यात १९ हजारांची घट झाली. चांदी दोन लाख ६६ हजारांपर्यंत खाली आली.
---
गेल्या काही दिवसांतील भाव (विनाजीएसटी)
तारीख --- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो)
६ मे--- एक लाख ५० हजार--- दोन लाख ४९ हजार
७ मे--- एक लाख ५१ हजार ५००--- दोन लाख ५७ हजार
९ मे--- एक लाख ५० हजार ८००--- दोन लाख ६० हजार
११ मे--- एक लाख ५० हजार--- दोन लाख ५९ हजार
१२ मे--- एक लाख ५१ हजार ५००--- दोन लाख ६९ हजार
१३ मे--- एक लाख ५९ हजार--- दोन लाख ८५ हजार
१४ मे--- एक लाख ६० हजार--- दोन लाख ८५ हजार
१५ मे--- १ लाख ५७ हजार ५००--- दोन लाख ६६ हजार