शून्य फेरीसाठी सोमवारपासून प्रवेश
अकरावी प्रवेश : पहिल्या फेरीसाठी बुधवारपासून नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ः इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. प्रारंभीच्या टप्यात कोट्याच्या जागांवर प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या शून्य फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. या फेरीतील प्रवेशाला सोमवार (ता.१८) पासून सुरुवात होईल. तर पहिल्या फेरीसाठी नोंदणीला गुरुवार (ता.२१) पासून सुरुवात होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यस्तरावर ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. ८ मेस प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले होते. इनहाउस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोट्यातील राखीव जागांसाठी शून्य फेरीअंतर्गत प्रवेश सुरु केले होते. या फेरीतील वेळापत्रकानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. व या यादीसंदर्भातील हरकती नोंदविण्यासाठी शनिवार (ता.१६) सकाळी दहापर्यंत मुदत असेल. यानंतर शून्य फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येतील.
इन्फो
पहिल्या फेरीची गुरुवारपासून प्रक्रिया
बुधवारी (ता.२०) रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला जाणार आहे. तर गुरुवार (ता.२१) पासून पहिल्या नियमित फेरीसाठी नोंदणीला सुरुवात होईल. पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी दोन दिवस मुदत दिली जाईल. २३ ते २६ मे हा कालावधी माहितीचे विश्लेषण करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. व २६ मेस या फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी २६ ते २८ मे अशी मुदत उपलब्ध असेल. ३० मेस दुसऱ्या नियमित फेरीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातून झालेली नोंदणी
जिल्हा नोंदणी केलेले विद्यार्थी
नाशिक ३२,०५५
जळगाव १७,३४९
धुळे ९,७२५
नंदुरबार ७,९९४
एकूण ६७,१२३