रस्ते दुरुस्त करा

रस्ते दुरुस्त करा
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H19312 धुळे ः पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करा, या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त स्वालिहा मालगावे यांना देताना ‘मी धुळेकर’ संघटनेचे पदाधिकारी. --- पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करा ‘मी धुळेकर’ संघटनेची मनपा प्रशासनाकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ ः शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेने महापालिका प्रशासनाकडे केली. मागणीचे निवेदन १३ मेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या उपायुक्त स्वालिहा मालगावे यांना निवेदन दिले. धुळे शहराची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढत असून, महापालिकेच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहर व कॉलनी परिसरात वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते खराब झाले असून, नव्याने विकसित झालेल्या भागांतील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट आहे. पावसाळ्यात खराब रस्ते, खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरात विविध भागांमध्ये भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच वीज विभागाची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भूमिगत गटार व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करून संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ‘मी धुळेकर’ संघटनेने निवेदनातून केली आहे. मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटू पोतदार, फरदिन शेख व आफ्रिदी शेख यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com