अवतीभवती- धुळे टुडे २ साठी...
---
अमेरिकेतील विद्यापीठातून
भाविका जैनला मास्टर्स पदवी
धुळे ः शहरातील विद्यार्थिनी भाविका मनोज जैन हिने अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या ''द ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी (The Ohio State University) मधून मास्टर इन सायन्स (MS) ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात तिला हा सन्मान प्रदान करण्यात आला. भाविकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळ्यातील कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलमधून झाले. त्यानंतर जयहिंद संस्थेच्या झेड. बी. पाटील महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून तिने देदिप्यमान यश मिळविले. या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर तिने व्हीजेटीआयमधीन बीटेक (B.Tech) पूर्ण केले. तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर ठसा उमटविण्याच्या जिद्दीने तिने अमेरिकेत पाऊल ठेवले आणि आज आपले ध्येय साध्य केले. तिच्या या यशामागे गुरुंचे आशीर्वाद असल्याची भावना तिचे वडील मनोज जैन यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल भाविकाचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.
---
नूतन माध्यमिकचा
निकाल ९६ टक्के
धुळे ः श्री कालिका विद्याप्रसारक संस्था संचलित बोरकुंड (ता. धुळे) येथील नूतन माध्यमिक कन्या विद्यामंदिराचा इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला. तीन विद्यार्थिनी अशा ः भाग्यश्री सोनवणे (९५.४०, प्रथम), द्वितीय- गायत्री माळी (८९.९०), तृतीय- राजश्री पवार (८९.६०). विद्यालयातील २३ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह १९ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत, तर सहा विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय गजानन पाटील, उपाध्यक्ष अखिलेश पाटील, सचिव आशुतोष पाटील, संचालिका हेमलता सूर्यवंशी, संचालक तथा समन्वयक भूषण पाटील, प्रशासकीय प्रमुख के. एफ. चौधरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.