लोगो : तंत्रस्नेही कुंभमेळा
फोटो: H19317
बोरसे ऑटोमोटिव्हच्या राधिका बोरसे.
स्वदेशी रोबोट बनविणारी बोरसे ऑटोमोटिव्ह
रोबोटच्या माध्यमातून मनुष्याचे काम हलके होते. विविध क्षेत्रातील जसे की कृषी, लॉजिस्टिक्स, औद्योगिक वाहतूक आणि सार्वजनिक प्रशासन यातील स्वदेशी रोबोट तयार करणारी बोरसे ऑटोमोटिव्ह या स्टार्टअप कंपनीविषयी.
स्टार्टअप काय आहे?
बोरसे ऑटोमोटिव्ह प्रा. लि. हा नाशिकस्थित स्टार्टअप तंत्रज्ञानावर आधारीत आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय कामे करू शकणाऱ्या स्वायत्त मानवरहित जमिनीवरील वाहनांची रचना आणि विकास करते. ही वाहने विविध औद्योगिक आणि कृषी उपयोगांसाठी एआय सेन्सर्स, जीपीएस नेव्हिगेशन आणि पेलोड सिस्टीमने सुसज्ज आहेत. कृषी, लॉजिस्टिक्स, औद्योगिक वाहतूक आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या क्षेत्रांसाठी स्वदेशी रोबोटिक सोल्यूशन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. २०२२ मध्ये तिची स्थापना झाली.
--
संशोधक कोण?
रोहित बोरसे, राधिका बोरसे, शेखर बोरसे या टीमकडे रोबोटिक्स, आयटी, एम्बेडेड सिस्टीम्स, ऑटोमेशन आणि स्वायत्त वाहन डिझाईनमध्ये कौशल्य आहे. त्यांचे संशोधन वास्तविक अभियांत्रिकीला भारतीय परिस्थितीसाठी व्यावहारिक उपयोगांशी जोडते. या सर्वांनी एकत्रितपणे या स्टार्टअपची सुरुवात केली.
--
यापूर्वी तंत्रज्ञानाचा कसा करण्यात आला
शेती: नांगरणी, पेरणी, फवारणी आणि कापणीच्या कामांसाठी
औद्योगिक स्वचालन: औद्योगिक परिसराअंतर्गत साहित्याची वाहतूक
स्मार्ट लॉजिस्टिक्स: दुर्गम किंवा मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये अवजड माल वाहून नेण्यासाठी
या प्रणालींचे प्रात्यक्षिक कृषी नवोपक्रम कार्यक्रम आणि औद्योगिक प्रदर्शनांमध्ये दाखवण्यात आले
--
कुंभमेळ्यादरम्यान याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो?
गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय किट, पिण्याचे पाणी आणि आपत्कालीन साहित्य वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होवू शकतो. तसेच स्वच्छता मोहिमेसाठी स्वच्छता साहित्याची वाहतूक, कचरा गोळा करण्यासाठी, निरीक्षण उपकरणे आणि दळणवळण प्रणाली वाहतूक, सुरक्षा पथकांना साहाय्य करण्यासाठी मानवी श्रमाशिवाय बॅरिकेड्स किंवा अत्यावश्यक साहित्य हलवून गर्दी व्यवस्थापनात मदत करण्यासाठी त्याचा प्रभावीपणे वापर होवू शकतो.
--
प्रशासनाला काय फायदा होईल?
दाट गर्दीत अत्यावश्यक साहित्याची जलद वाहतूक होईल. सुधारित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आध्यात्मिक कार्यक्रमादरम्यान प्रगत स्थानिक स्टार्टअप तंत्रज्ञानाचा अवलंब करून नाशिक एक स्मार्ट शहर म्हणून नावारूपास येईल.