स्नेहमेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा सोनेरी आठवणींना उजाळा

स्नेहमेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा सोनेरी आठवणींना उजाळा
Published on
अँकर --- NSK26H22024 नंदुरबार : स्नेहमेळाव्याला उपस्थित निवृत्त शिक्षक, शिक्षिका. --- स्नेहमेळाव्यात निवृत्त शिक्षकांचा सोनेरी आठवणींना उजाळा विविध शहरांतील माजी शिक्षक एकत्र; ज्येष्ठांचा सत्कार व दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २२ : नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, एम.सी.व्ही.सी., डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल आणि डॉ. काणे विद्यामंदिर विद्यालयातील निवृत्त शिक्षक-शिक्षिकांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात शिक्षकांनी आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देत जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. नंदुरबारसह मुंबई, पुणे, नाशिक आणि सुरत येथे वास्तव्यास असलेले निवृत्त शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर सर्व सहकारी एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा स्थापनेपासून आतापर्यंत दिवंगत झालेल्या ६९ सहकाऱ्यांना या वेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच ८० वर्षांवरील ज्येष्ठ निवृत्त शिक्षकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला. मनोगत सत्रात मनोगताच्या सत्रात ए. बी. टेंभेकर, एम. के. गोस्वामी, आर. ओ. मराठे, आर. के. जोशी, ए. व्ही. धुपकर, के. एस. वाणी, व्ही. बी. शिंपी, आर. जी. पाटील, एस. जी. हिवरे, एन. के. भदाणे, मनीषा अग्निहोत्री, लता टेंभेकर, सुलभा महिरे, प्रमोद जोशी, सविता कुलकर्णी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, अनुभव आणि प्रसंग कथन केले. शिक्षकांनी काव्यवाचन, गीतगायन, बासरीवादन, तसेच खुमासदार किस्से सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उद्धव तांबोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. --- चौकट स्नेहमेळाव्याची वैशिष्ट्ये - विविध शहरांतील निवृत्त शिक्षकांची उपस्थिती - ६९ दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली - ८० वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांचा विशेष सत्कार - काव्यवाचन, गीतगायन व बासरीवादनाने रंगला कार्यक्रम - जुन्या आठवणींना उजाळा देत सहकाऱ्यांचा भावनिक पुनर्मिलाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com