कोणत्याही घटनेकडे विशिष्ट
चौकटीतून बघू नका
--
साहिल कबीर : दाभोलकर व्याख्यानमालेत प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : शब्द हे संस्कृतीची ओळख असतात. त्यामुळे कोणत्याही घटनेवर सहिष्णुता चिकटवली गेली की त्याच्याकडे विशिष्ट चौकटीतून बघितले जाते. त्यासाठी सहिष्णुता शब्द पहिले बाद करायला हवा असे प्रतिपादन लेखक साहिल कबीर यांनी केले.
--
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १५० वे पुष्प गुंफताना कबीर बोलत होते. गंगापूर रोडवरील आयएमआरटी सभागृहात शनिवारी (ता. २०) व्याख्यान झाले. ‘आकलन मराठी मुसलमानांचे’ या विषयावर विविध घटनांचा संदर्भ देत कबीर यांनी वस्तुस्थिती मांडली. १९९० नंतर अर्थव्यवस्थेत झालेली क्रांती, बाबरी मशीद वाद आणि शहाबानो प्रकरण या तीन घटनांमुळे मुस्लिमांविषयी संथ गतीने समाजात विष पेरले गेले. त्यामुळे व्यवस्थेची अवस्था झुरळासारखी झाली आहे. बहुसंख्यवादाचा समज इतका पसरवला गेला आहे की मुस्लिमांचा वेगळा असा विचारच केला जात नसल्याची खंत साहिल कबीर यांनी व्यक्त केली. सचिन मालेगावकर यांनी प्रास्ताविक केले. शामला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन एम्स चॅरिटेबल ट्रस्ट यांचे होते..
----
फोटो : ६०४७०
--------