ॲंकर
NSK26H22192
जळगाव : ‘मृगोत्सव’ उत्साह समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवर व कलावंत.
----
आशा-सुमन स्वर सुमनांजलीने रसिक मंत्रमुग्ध
गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या ‘मृगोत्सवा’त सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘मृगोत्सव’ कार्यक्रमांतर्गत ‘आशा-सुमन : स्वर सुमनांजली’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवारी (ता. २०) महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात झाला. प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना विद्यार्थ्यांनी स्वरांजली अर्पण केली. पावसाळा आणि संगीताचा सुरेल संगम अनुभवासाठी रसिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार प्रधान’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर ‘नाविका रे’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘केतकीच्या वनी तिथे’, ‘केशवा माधवा’ यांसारखी लोकप्रिय गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच ‘पिया बावरी’ आणि ‘कोई शहरी बाबू’ या गीतांवरील कथक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील आणि पद्मजा नेवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समीक्षा माकोडे, वेदिका झारे, मंजिरी जोशी, राजश्री पाठक, अलका खैरनार आदींनी गायन व नृत्याचे सादरीकरण केले. कलाकारांना सिंथेसायझरवर सुशील महाजन, ऑक्टोपॅडवर प्रा. देवेंद्र गुरव आणि तबल्यावर प्रवीण महाजन यांनी साथसंगत केली. संध्या फासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महिमा मिश्रा यांनी प्रास्ताविक व आभार मानले. प्राचार्या पद्मजा नेवे आणि डॉ. महिमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यशस्वितेसाठी राजू पाटील, भूषण खैरनार, अनंता साठे, किशोर चौधरी आणि ईश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.