काठी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

काठी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
Published on
NSK26H22214 नंदुरबार : सामाजिक सभागृहाच्या उद्‍घाटनाप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करताना सी. के. पाडवी. शेजारी विजय पराडके. --- सामाजिक सभागृहाचे काठी येथे भूमिपूजन नंदुरबार : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काठी येथे हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्ग्याजवळ २० लाखांच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांची दर्गा हे या परिसरातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक श्रद्धास्थान असून, हिंदू आणि मुस्लिम समाजातील भाविक आदराने भेट देतात. या ठिकाणी दर वर्षी उरुस उत्साहात साजरा केला जातो. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक सभागृहाचा यासाठी उपयोग होणार असल्याचे आमदार रघुवंशी यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय पराडके, माजी जि. प. सदस्य सी. के पाडवी, नगरसेवक परवेज खान, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com