विधान परिषद निवडणूक (लोगो)
----
NSK26 H22217
जळगाव : विधान परिषद निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार नंदकिशोर महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत केलेला जल्लोष.
------
जळगावात भाजप-महायुतीच्या
महाजनांचा दणदणीत विजय
उपशीर्षक
प्रतिस्पर्धी ‘मविआ’च्या तायडे यांना अवघी १७ मते
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासून चर्चेत ठरलेल्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढत अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाली. यात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी तब्बल ५८२ प्रथम पसंतीची मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. प्रतिस्पर्धी मविआ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शरद तायडे यांना अवघी १७ मतेच मिळू शकली.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६३ प्रतिनिधींपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (ता. २२) झालेल्या मतमोजणीत एकूण ६११ वैध मतांची गणना होऊन पाच मते अवैध ठरली. चाळीसगाव येथील शहर विकास आघाडीच्या ११ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
निवडणूक रिंगणातील अनिल चौधरी यांना ११, तर रेश्मा काळे यांना एक मत मिळाले. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अर्चना मोरे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी पार पडली.
चौकट
आकडे दृष्टिक्षेपात...
एकूण मतदान : ६३०
झालेले मतदान : ६१६
अवैध मते : ०५
मोजणी झालेली मते : ६११
विजयासाठी कोटा : ३०६
----
उमेदवारनिहाय मिळालेली मते
नंदकिशोर महाजन : ५८२
शरद तायडे : १७
अनिल चौधरी : ११
रेश्मा काळे : ०१